रवळजी गावाची माहिती
रवळजी हे गाव कळवण तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. कळवण शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर पुनद नदी किनारी वसलेले जवळपास रवळजी गाव…
मोकभणगी महसूली केंद्र व देसराणे सज्जे अंतर्गत जवळपास २२०० लोकसंख्या असलेल्या मौजे रवळजी गावाची जवळपास २२०० लोकसंख्या असलेले रवळजी गाव .
इ.सन पूर्वी भगवान ‘राम ‘ नाशिक ( पंचवटी ) जात असतांना येथील मोठीदर ‘ प्रेमगिरी ‘ या डोंगरावर भगवान श्रीराम यांच्या पाऊलांचा खुना ( पादुका ) असून शेजारी पाण्याचे तळे असल्याने या डोंगराला ‘टाका डोंगर ‘ म्हणून संबोधले जात असल्याचे जुने जाणकार वृद्ध नागरिक सांगतात. यामुळे ‘टाका ‘ डोंगरावर स्थानिक व परिसरातील पर्यटक पावसाळ्यात आनंदअसतात. तसेच येथील डोंगरावरी (टाका )तळ्यातील पाणी आणुन त्या पाण्याची पिकांना फवारणी केल्याने पिकांवर किड , मावा , अळी या रोगांवर उपचार करत असल्याची अख्यायिका जुने नागरिक सांगतात.
साधारण ३० – ४० वर्षापूर्वी येथील आदिवासी बहुल गावात शंभर टक्के जिरायती क्षेत्र असल्याने भुईमुंग , उडीद , बाजरी , नागली आदि कडधान्य पिके घेतली जात होती. कालांतराने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत जवाहर रोजगार योजनेअंतर्गत विहीर , धरणे, के.टी. वेअर बंधारे उपक्रम राबवून बागायती क्षेत्र वाढले. त्यातून उत्पन्न वाढल्याने येथील शेतकरी गुण्यागोविंदाने नांदत आहे.
गावात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा सुरू आहे. आज जवळपास ३५० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.
रवळजी ग्रामपंचायत अंतर्गत गाव अंतर्गत रस्ते , स्मशानभूमी , दिवाबत्ती , सुविधा असून ग्रामपंचायतीच्या विहिरीतून गावात , श्रीकृष्ण पाडे व आदिवासी वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या घरकूल योजना , रमाई घरकुल योजना , पंतप्रधान आवास योजना लाभार्थींना लाभ दिला जात आहे. समस्त रवळजी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून भव्यदिव्य हनुमान मंदिर , श्रीकृष्ण मंदिर , महादेव मंदिर बांधले असून वर्षभरात सप्ताह , श्रीमद् भागवत कथा सारखे विविध कार्यक्रम राबविले जातात. रवळजीच्या तीनही बाजु डोंगर दरीच्या असल्यामुळे हे गाव निसर्गसौदर्याच्या कुशीत वसले आहे. या डोंगरातुन लहान मोठे नदी नाले वाहतात. या गावाला विस्तीण असे जंगल लाभले आहे. या जंगलात विविध प्रकारची झाडे, वेली, कंदमुळे औषधी वनस्पती व मध डिंक मिळते. आणि यात विशेष म्हणजे पुर्वीपासुन रानकेळी या जंगलात
मोठया प्रमाणात आहेत, म्हणुन या गावाला रवळजी हे नाव पडले आहे. रवळजीच्या मुख्य डोंगरावर शनीदेवाची स्थापना फार पुर्वीपासुन आहे. आणि याच ठिकाणी डोंगराच्या माथ्यावर जुन्या काळात गवळी लोकांचे वास्तव्य आढळते. तसे त्यांचे अवशेषही आपल्याला पहावयास मिळतात. माणुस म्हटले की पाणी मुलभुत गरज आहे आणि म्हणुन त्यांच्या काळात या डोगरावर दोन मोठे खड्रडे कोरले आहेत आणि त्यातुन ते पाण्याची गरज भागवत असत. अजुनही ते येथे अस्तित्वात आहेत. सध्या गुरे चारणारेही आपली तहान येथे भागवतात. वडीलांच्या म्हणण्या नुसार राम लक्ष्मण् वनवासात आले असतांना या ठिकाणी त्यांनी सांबरदैत्य नावाच्या राक्षसाचा वध् केला आणि ते येथे पाणि पिउन पुढे गेले, म्हणुन या टाक्याला सांबरटाका असे नाव पडले आहे. रवळजीच्या जंगलात अनेक प्रकारची पशु पक्षी आपल्याला पहावयास मिळतात. यात विशेषता मोर, वाघ ससे, कोल्हे, लांडगे, माकडे अशी अनेक प्रकारची प्राणी या जंगलात आहेत.रवळजी गावाला जुना इतिहास लाभल्याने गावात काही जुन्या रुढी परंपरा अजुनही पाळले जातात उदा. डोंगरेदेव सारखे कायक्रम केले जातात रवळजी गावाचे मुख्य वैशिष्ये म्हणजे येथे अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक मोठया बंधुभावाने राहतात गावात जुन्या काळातील ग्रामसभेसाठी बांधलेली बैठक अस्तित्वात आहे. तसेच गावाला पाणी पुरवठयासाठी जुनी विहीर आहे विशेष म्हणजे अजुनही या विहीरीतुन गावाला पाणीपुरवठा केलाजातो. बदलत्या काळानुसार गावात नवनवीन सुधारणा झाल्या आहेत. गावाला स्वतंञ ग्रामपंचायत आहे दहावीपयत शाळा आहे, म्हणुन गावाचा विकास होत आहे.
ग्रामपंचायतीची स्थापना :
गावाजवळचे बसस्थानक :- कळवण, रवळजी
प्रमुख तीर्थस्थळे :- सप्तश्रृंगी गड, मार्कडेय
पर्यटन स्थळे :- सापुतारा
तालुकापासुंचे गावाचे अंतर :- ०७ कि.मि.
जिल्हास्तरापासून गावाचे अंतर :- ७५ कि.मि.